March 22nd, 2009 by Zareef Ahmed

वंदना सदन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित
नोंदणी क्रंमाक- टि.एन्‌.ऎ (व्ही.ए‍स्‌.आय) एच्‌.एस्‌.जी. (टीसी) ३९६६/९०-९१
मनवेलपाडा रोड, सर्वे क्रं. २३२, विरार ( पूर्व ) ता. वसई, जि. ठाणे. ४०१३०५.

प्रति, दिनांक २० आँगस्ट, २००९.
सचिव / अध्यक्ष

आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक जण करिअर चांगलं होण्यासाठी धडपडत असतो. आजच्या स्पर्धेत टिकून रहायचे असेल तर करिअर उत्तम असणे हे एकमेव साधन आहे. शिक्षणाची नवीन दालने दिवसेंदिवस उघडत आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड प्रत्येक ठिकाणी दृष्टीस पडते आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे अतोनात पैसे शिक्षणावर खर्च करावे लागतात आणि ते अपरिहार्य आहे. लाखो रुपयांचे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक कर्ज घेतले जाते. त्याच्या परतफेडीचे हप्ते भरता भरता, पालकांच्या आयुष्यभरची पुंजी त्यात संपून जाते.

अनेकदा असे दिसते की, लाखो रुपये खर्चून पालक त्यांच्या मुलांसाठी एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. पण हुशार मुले देखील तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाहीत. अनेकांच्या बाबतीत असेही घडते की, ते अभ्यासक्रम पूर्ण करतात पण त्या क्षेत्रात त्यांना हवे तसे यश मिळत नाही. शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करूनही करिअर अयशस्वी झालेल्यांचे समाजातील प्रमाण लक्षणीय आहे.

विद्यार्थ्याचा कल कुठे आहे हे निश्चित करण्यासाठी अनेकविध अँटिट्यडू टेस्टचे पेव फुटले आहे. दोन भिन्न ठिकाणी दिलेल्या अँटिट्यडू टेस्टचे निष्कर्ष भिन्न येण्याचे प्रमाणही चांगलेच आहे. एका ठिकाणी सांगितले की जाते की मुलाने चार्टर्ड अकाऊंटंट व्हावे तर दुसर्‍या ठिकाणी म्हणतात की त्याने सॉफ्टवेअरमध्ये जावे.

पु.लं.च्या भाषेत सांगायचे तर, ” कुलाबा ऑब्झर्व्हेटरी सांगते की मुसळधार पाऊस तर सांताक्रूझवाले सांगतात निरभ्र आकाश” अशी गत आहे.

“वंदना सदन गणेशोत्सव मंडळा तर्फ़े “विभागातील नागरीक व मुलासाठी एक अनोखा कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. ह्या कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी आपण आपल्या संकुलातील नागरीकांना व मुलांना आपल्या तर्फ़े कळविण्यात यावे.

सदर कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे आहे. ( वेळ संध्याकाळी ०७ ते ०९ )

१. १० वी व ११ वी च्या मुलासाठी
BE A COMPUTER EXPRERT “101 COMPUTER TRICKS & TIPS” Windows, Internet, Software, Hardware, Macromedia Dreamweaver, Photoshop, Flash Other etc. ( दिनांक २३/०८/२००९ व २९/०८/२००९ )

२. B.S.C. ( IT ) 1st Years to 3rd Years Student “Career Guidance“ (दिनांक ३०/०८/२००९)

३. नागरिकांसाठी “ भारतीय वास्तु शास्त्राचा “ तीन दिवसाचा कोर्स.
( फ़ि रु १००/-दिनांक २४/०८/२००९ ते २६/०८/२००९ )

ज्यांना ह्या उपक्रमास सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी आपली नांवे श्री तंरग पाटील एफ़/२०२ वंदना सदन, मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व). ह्यांच्याकडे दिनांक २२ आँगस्ट, २००९ पर्यंत नोंदवावीत. प्रवेश मर्यादित आहे.

आपले
श्री अनंत अंभिरे श्री मधुकर निगुडकर
अध्यक्ष उत्सव समिती अध्यक्ष वंदना सदन

Leave a Reply